breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीतील अराजकतेसाठी जो बायडनचा राजीनामा मागणार का ? राऊतांनी उपस्थित केले अनेक प्रश्न

नवी दिल्ली – दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकतेसाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. कोणाचा राजीनामा मागणार? सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे,शरद पवार की जो बायडनचा?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर परेड काढली होती. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने दिल्लीतील स्थिती बिघडली. आंदोलकांनी लाल किल्ल्यावर देखील इतर ध्वज फडकवले. यावरून संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

सरकार याच दिवसाची वाट पाहत होते का? सरकारने लाखो शेतकऱ्यांचे म्हणणे इतके दिवस ऐकून घेतले नाही. ही कशाप्रकारची लोकशाही आपल्या देशात जन्म घेत आहे?, ही लोकशाही नाही तर काहीतरी वेगळंच चालले आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, सरकारने ठरवले असते तर दिल्लीतील आजचा हिंसाचार टाळता आला असता. तिथे जे चाललं आहे त्याचं कुणीच समर्थन करू शकत नाही. काहीही झालं तरी लाल किल्ला आणि तिरंग्याचा अवमान सहन केला जाऊ शकत नाही. मात्र, त्याचवेळी स्थिती का बिघडली? हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. सरकार शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करायला तयार नाही. यात कोणती तरी अदृश्य शक्ती राजकारण करत आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button