breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

किरीट सोमय्यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमची धडक; अटकेची टांगती तलवार

मुंबई |

‘आयएनएस विक्रांत’ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेची टीम किरीट सोमय्या यांच्या मुलुंड येथील निवासस्थानी पोहोचली आहे. सोमय्या यांच्यावर ‘विक्रांत’साठी जमावण्यात आलेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी किरीट सोमय्या यांच्या घरी दाखल झाले. मात्र किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या हे दोघेही घरी नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या दोघांनी चौकशीसाठी उद्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावं, अशी नोटीस अधिकाऱ्यांकडून त्यांची घरी आणि कार्यालयात देण्यात आली आहे.

‘विक्रांत’च्या निधीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टानेही सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाला गती आली असून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी थेट सोमय्या यांच्या घरी धडक दिली. ‘विक्रांत प्रकरणातील तपासासाठीच आम्ही इथं आलो आहोत, मात्र या प्रकरणात लगेच अधिक भाष्य करता येणार नाही,’ असं सोमय्या यांच्या घरी दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून गेल्या काही दिवसांपासून पिता-पुत्र अज्ञातवासात आहेत. आता पोलिसांनी चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावल्यानंतर हे दोघेही आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात जाणार का, हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

  • ‘गायब’ असणाऱ्या सोमय्यांनी जारी केला व्हिडिओ

पोलीस कारवाई टाळण्यासाठी अज्ञातवासात गेलेल्या किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर आज एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला आव्हान दिलं आहे. ‘ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांवर शेवटची कारवाई होईपर्यंत मी झुकणार नाही आणि मागे हटणार नाही. माझ्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी सर्व माहिती आम्ही उच्च न्यायलयात देणार आहोत,’ असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button