पिंपरी / चिंचवड

ब्राऊन शुगर विक्री प्रकरणी महिलेला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

ब्राऊन शुगर विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून पाच लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 11) दुपारी पावणे दोन वाजता गुरुदत्तनगर, पिंपरी येथे करण्यात आली.

माया दिलीप रणदिवे (वय 45, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक संदीप पाटील यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला गुरुदत्तनगर येथे ब्राऊन शुगर विकत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन कारवाई केली. महिला माया रणदिवे ही गुरुदत्तनगर येथील म्हसोबा मंदिराच्या ओट्यावर बसून ब्राऊन शुगर विकत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी माया हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून पाच लाख 25 हजारांचे 105 ग्राम वजनाचे ब्राऊन शुगर आणि ब्राऊन शुगर विक्रीतून मिळालेले दोन हजार 200 रुपये असा एकूण पाच लाख 27 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button