breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

किरीट सोमय्या उद्या सांताक्रुझ पोलिस ठाण्यात हजर राहणार

 

मुंबई | प्रतिनिधी 
सांताक्रुझ ठाण्याच्या पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात मी उद्या रविवारी २० फेब्रुवारीला सकाळी ११.३० वाजता पोलिस ठाण्यात हजर राहणार आहे, अशी माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये दिली आहे. छगन भुजबळ यांच्या बेनामी मालमत्तेची पाहणी केली म्हणून माझ्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी ४ सप्टेंबर २०२१ रोजी सांताक्रुझला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचे सांताक्रुझ ठाण्याच्या पोलिसांनी त्यांना पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे. याबाबत १५ दिवसांच्या आत पोलिस ठाण्यात हजर होऊन लेखी खुलासा करण्यास त्यांना सांगितले होते. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या बेनामी मालमत्तेची पाहणी केली म्हणून आपल्या विरोधात पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मी उद्या रविवारी २० फेब्रुवारीला सांताक्रुझ पोलिस ठाण्यात हजर राहणार आहे, अशी माहिती सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button