TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कल्पना ‍भिगवणकर ठरल्या “नारीशक्ती प्रश्नमंजूषा” स्पर्धेच्या विजेत्या

पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन

पिंपरी | पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाच्या उददेशाने “नारीशक्ती प्रश्नमंजूषा” स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कल्पना ‍भिगवणकर या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. तर, ज्योती तहसीलदार व स्मिता अंकुशे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक ‍मिळविला. विजेत्यांना भेटवस्तू देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी सातशेहून अधिक महिलांनी प्रत्यक्ष व ऑनलाईन पध्दतीने सहभाग नोंदविला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे महिलादिनी कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी, महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती अॅड. नितिन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे, नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे अनुराधा गोफणे, निर्मला गायकवाड, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उप आयुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, विविध महिला बचत गटांचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘नारीशक्ती’ या संकल्पनेवर आधारित १६ प्रश्नांवर सदर स्पर्धा घेण्यात आली. महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्पर्धेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या महिलांची नावे घोषित करून विजेत्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. प्रसंगी, मान्यवरांनी महिलांशी संवाद साधला. मान्यवरांनी विजेत्या महिलांचे अभिनंदन केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभाग, नागरवस्ती विभागामार्फत महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये बचतगट यांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षम अश्या संस्था निर्माण करण्याचे काम सूरू आहे. महिलांचे उपजीविकेचे स्त्रोत वाढविण्यासाठी महिलांना निधी आणि कर्ज उपलब्धतेसाठी मदत होत आहे. महिला बचत गटामार्फत उत्पादित करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उत्पादीत वस्तूंच्या मार्केटिंगसाठी सुध्दा मदत उपलब्ध होते. आकर्षक ब्रँडींग व पॅकेजिंगवर काम करण्यासाठी प्रशिक्षणे व अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत असल्याचे महिलांनी यावेळी सांगीतले. तसेच, योजनांबाबत समाधान व्यक्त केले. आपला आवाज आपली सखी ग्रुपच्या अध्यक्षा संगीता तरडे यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

तत्पूर्वी, मनपा क्रीडा विभाग व स्मार्ट सिटीच्यावतीने ‘ती’ या विषयावर ऑनलाईन वेबिनार घेण्यात आला. यामध्ये, समाजात आपली मोहोर उमटविणा-या महिलांना आमंत्रित करून त्यांनी त्यांचा जिवन प्रवास मांडला. त्याचबरोबर, सहभागी महिलांना मार्गदर्शन केले. सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे यांनी देखील वेबिनारमध्ये सहभाग नोंदविला. थिएटर वर्कशॉप कंपनीच्या अमृता ओंबळे यांनी सुत्रसंचालन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button