breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारत-न्यूझीलंड आज आमने-सामने, भारतीय संघात मोठा बदल

IND vs NZ : वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेतील २१ वा सामना आज भारत आणि न्यूझीलंडदरम्यान खेळवला जात आहे. पॉइण्ट्स टेबलमधील अव्वल २ संघांचा हा सामना हिमाचलमधील धर्मशालाच्या मैदानात खेळवला जात असून दोन्ही संघांनी स्पर्धेतील आतापर्यंतचे आपआपले ४ ही सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे या सामन्यामध्ये बाजी मारुन कोण अव्वल स्थानी कायम राहणार हे आज निश्चित होणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताने हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर ऐवजी सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांना प्लेईंग-११मध्ये संधी मिळाली आहे.

भारत प्लेइंग इलेव्हन संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

हेही वाचा – PMPML बस चालकानं बस रिव्हर्स घेत गाड्यांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल.. 

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन संघ :

डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

किती वाजता पाहता येणार सामना?

दुपारी २ वाजता

कुठे पाहता येणार सामना?

स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर
मोबाईल : डिस्ने+हॉटस्टार अॅपवर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button