breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

जो बायडेन अडचणीत! ते राष्ट्राध्यक्ष बनावे ही ओसामा बिन लादेनची इच्छा

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील अमेरिकन सैनिक मागे घेण्याच्या भूमिकेवरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनावे अशी अल्-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन यांची इच्छा होती. त्याबाबत त्याने मे २०१० मध्ये पत्र लिहिले होते. ते पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यास अल्-कायदासाठी ही एक चांगली गोष्ट घडेल, असे लादेनने या पत्रात म्हटले आहे. यामुळे बायडेन यांच्या भूमिकेविषयी निर्माण झालेल्या संशयाला आणखी बळकटी मिळाली आहे.

जो बायडेन हे अमेरिकन सरकार चालवण्यास सक्षम नाहीत. त्यांचे नेतृत्त्व अतिशय कमकुवत आहे. कठीण प्रसंगात ते अमेरिकेला संभाळू शकत नाहीत, असे लादेनला वाटत होते. तेव्हा ओबामा यांची हत्या झाली तर बायडेन राष्ट्राध्यक्ष बनतील आणि ती अल्-कायदासाठी चांगली संधी असेल असे त्याचे मत होते. मे २०१० मध्ये त्याने हे पत्र लिहिले आहे. ४८ पानांच्या या पत्रात त्याने ३६व्या पानावर हल्ल्यासाठी दोन पथके तयार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यातील एक पथक पाकिस्तानात आणि दुसरे अफगाणिस्तानात असेल. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी बायडेन यांची प्रतिमा अतिशय कमकुवत दिसत आहे. त्यातच लादेनचे हे पत्र व्हायरल झाले आहे. यामुळे अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याच्या बायडेन यांच्या भूमिकेविषयी आता आणखी संशय निर्माण झाला आहे. यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button