breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेशमुंबईराष्ट्रिय

खंडग्रास सूर्यगृहण : गृहण सुटण्याआधीच आज सूर्यास्त होईल!

नवी दिल्ली: भारतासह जगात अनेक देशांमध्ये आज खंडग्रास सूर्यग्रहण पहायला मिळणार आहे.भारतात ईशान्य भाग वगळता अनेक भागांमध्ये आज संध्याकाळी चार वाजून २९ मिनिटांपासून पाच वाजून ४२ मिनिटांपर्यंत सूर्यास्त होईपर्यंत हे ग्रहण दिसणार आहे. या वर्षातले हे शेवटचे ग्रहण असल्याने खगोलप्रेमींसाठी ही पर्वणी असणार आहे. पुढील सूर्यग्रहण पाच वर्षांनी म्हणजेच २ ऑगस्ट २०२७ मध्ये दिसणार आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून दिसणार आहे.

मुंबईतून पाहिल्यास सायंकाळी ४:४९ वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. ग्रहण मध्य सायंकाळी ५.४३ वाजता होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा ३६ टक्के भाग झाकून टाकणार आहे. ग्रहण सुटण्याआधीच सायंकाळी ६:०८ वाजता सूर्यास्त होईल.सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सूर्यग्रहण थेट पाहू नये.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button