breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

Indrayani Thadi-2023 : ‘इंद्रायणी थडी’ महोत्सवात ग्रामसंस्कृतीचे खास आकर्षण

इंद्रायणी थडी 2023 महोत्सवात उभारले शिवकालीन मावळ्यांचे पुतळे

पिंपरी चिंचवड | विशेष प्रतिनधी : भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा पिंपरी चिंचवडचे शहाराध्यक्ष महेश लांडगे आणि शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे यांच्या संकल्पनेतून इंद्रायणी थडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 जानेवारीपासून इंद्रायणी थडी महोत्सव सुरू होत असल्याने जोरदार पूर्वतयारी करण्यात येत आहे.

अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती भोसरीमध्ये उभारण्यात आली आहे. इंद्रायणी थडी महोत्सवाच्या प्रवेशद्वारासमोर श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. अनेक कारागीर याठिकाणी काम करत आहेत. सध्या रंगरंगोटीच्या कामाची लगबग सुरू आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह शिवकालीन शुर मावळ्यांचे भव्य पुतळे उभारण्यात आले आहेत. विशेष आकर्षण म्हणजे इंद्रायणी थडी महोत्सवात ग्राम संस्कृती साकारण्यात आली आहे. याशिवाय इंद्रायणी थडी महोत्सवात अनेक तरुणांना रोजगाराची संधी भेटणार आहे. या महोत्सवात 1000 पेक्षा अधिक स्टॉलची व्यवस्था केली आहे.

महोत्सवामध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृती, ग्राम संस्कृती, खाद्य महोत्सव, बाल जत्रा, परंपरिक खेळ, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, पाटील वाडा प्रतिकृती, भजन महोत्सव, मर्दानी खेळ, विविध भागातील कलाकृती आणि हस्तकला प्रदर्शन, खेळ रंगला पैठणीचा, मंगळगौर खेळ यासह फॅशन शो, महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर, सिनेतारका नृत्य, पारंपरिक नृत्य, जादूचे प्रयोग, झुंबा डान्स अशा विविध कार्यक्रम एकाच छताखाली उपलब्ध आहेत.

ग्रामसंस्कृतीचे खास आकर्षण
शिवकालीन मावळ्यांचे पुतळे
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button