breaking-newsआंतरराष्टीयमनोरंजन

JNU Attack: दीपिकाच्या JNU भेटीवर पाकच्या मेजर जनरलचं ट्विट, पण लगेच केलं डिलीट!

नवी दिल्ली | महाईन्यूज

अभिनेत्री दीपिका पादुकोणनं जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यावेळी तिनं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. दीपिकाने अचानक जेएनयूत पोहोचत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. यावेळी कन्हैया कुमारही दीपिकासोबत दिसल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. दीपिकाच्या या भूमिकेच पाकिस्तानच्या मेजर जनरल असिफ गफूर यांनी स्वागत केलेलं आहे.

दीपिकाने आंदोलनात सहभाग नोंदवल्यानंतर अनेकांनी तिच्या या कृतीचे जोरदार समर्थन केलेले आहे. तर, काहींनी यावरून दीपिकाला लक्ष्य करत तिच्या आगामी सिनेमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. भाजपाचे नेते आणि समर्थकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. दीपिकाची जेएनयू परिसरातील उपस्थिती राजकीय स्वरुपाची असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं आहे. तर काहींनी हा तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असल्याचं म्हटलेलं. मात्र, दीपिकाच्या या भूमिकेचं थेट पाकिस्तानमधून कौतुक करण्यात आलेलं आहे.

जम्मू आणि काश्मीरसह, आसाम आणि संपूर्ण भारतात … असे ट्विट गफूर यांनी केले होते. तसेच, काश्मीर पाकिस्तानचा आहे, असा हॅशटॅगही त्यांनी दिलेला होता. दरम्यान, आपण निर्भीडपणे आपलं मत मांडत आहोत, हे पाहून मला अभिमान वाटतो, असं दीपिकानं जेएनयूतील विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर म्हटलेलं आहे. लोक समोर येऊन आणि कोणतीही भीती न बाळगता आवाज उठवत आहेत. हा निर्भीडपणा कौतुकास्पद आहे, असंही दीपिका म्हणाली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button