breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

JNU हिंसाचार प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगलला नोटीस

नवी दिल्ली | महाईन्यूज

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी (5 जानेवारी) विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. यानंतर आता जेएनयू हिंसाचार प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगलला नोटीस बजावलेली आहे.

जेएनयू हिंसाचार प्रकरणी कॅम्पसमध्ये घडलेल्या घटनेबाबत संबंधित डेटा जतन करुन ठेवण्याच्या मागणीसाठी दिल्ली हायकोर्टाने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगलला नोटीस बजावली आहे. जेएनयूतील तीन प्राध्यापकांनी हिंसाचारावेळचे सीसीटीव्ही फुटेज, संदेश आणि इतर पुरावे जतन करण्यात यावेत या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल केलेली होती. यावर सोमवारी (13 जानेवारी) हायकोर्टाने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगलला नोटीस पाठवून मंगळवारपर्यंत यावर उत्तर मागितलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button