breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’चे टीझर पोस्टर लाँच…गॉगल लावलेली बिन चेहऱ्याची व्यक्ती,विद्यापीठाची इमारत सगळंच भन्नाट…

नावापासूनच चर्चेत आलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’चे टीझर पोस्टर लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरवरून चित्रपट अतिशय धमाल आणि मनोरंजक असणार असल्याचे दिसंतंय… एप्रिल २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तारेखसंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कोल एलएलपीतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे तर फटमार फिल्म्स एलएलपीच्या नेहा गुप्ता, प्रसाद नामजोशी यांनी ब्लिंक मोशन पिक्चर्स, अभिषिक्ता इन्फोटेन्मेंट प्रा. लि.आणि कोल फिल्म्सच्या संकेत बियाणी, संदेश बियाणी, विकास वोहरा, सुशील कंठेड, रितेश चितलांगिया यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पर्यावरण अभ्यासक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर प्रसाद नामजोशी यांनीच पटकथा आणि संवाद लेखन केलं आहे. चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

‘बास काय भावा’, ‘दुसऱ्यांना खाज आहे म्हणूनच आपल्याला माज आहे’, ‘निस्ता धूर अशा ओळी, गॉगल लावलेली बिन चेहऱ्याची व्यक्ती, विद्यापीठाची इमारत, असे सारे या पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे एकूण पोस्टरचा बाज पाहता चित्रपट धमाल आणि मनोरंजक असेल असे संकेत मिळतात. आता या पोस्टरमुळे चित्रपटाचं कथानक काय, चित्रपटात आणखी कोण कलाकार आहेत याची उत्सुकता निर्माण झाली आहे. पण त्यासाठी एप्रिल २०२० पर्यंत वाट पाहवी लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button