breaking-newsपिंपरी / चिंचवड

पवना नदी महिलेचा संशयास्पद मृत्यू

पिंपरी (महा ई न्युज)- पवना नदीत बुडून महिलेचा मृत्यू झाला. हा प्रकार आज (रविवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आला. केजुबाई बंधा-यामधून तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर महिलेचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

सुमारे दहा दिवसांपूर्वी मावळ भागात पवना नदीमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाल्याचा संशय स्थानिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. बुडालेल्या महिलेचे वय अंदाजे 40 वर्ष आहे. तिच्या मानेवर इंग्रजीभाषेत रोहन (Rohan) या नावाचा टॅटू काढण्यात आला आहे.

अग्निशमन विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेदहा वाजता एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचा चिंचवड मधून कॉल आला. त्यानुसार बंब आणि बचाव पथक दाखल झाले. चिंचवड मधील केजुबाई बंधारा येथे पाण्याच्या भोव-यावर सुमारे 40 वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. बोटीमधून तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला असता तीन वेळा बोट पाण्याच्या भोव-यात अडकली. सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी साडेचार वाजता महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पवना नदीमध्ये मावळ परिसरात महिला पाण्यात पडली. पोहता न आल्याने तिचा मृत्यू झाला असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे..

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button