breaking-newsपिंपरी / चिंचवड

जाधववाडीत सामुदायीक विवाह सोहळा, नावनोंदणीचे आवाहन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जाधववाडीत सर्वधर्मीय सायमुदायीक विवाह सोहळा घेण्यात येणार आहे. हा सोहळा १५ मार्च रोजी राहुलदादा जाधव स्पोर्ट फौंडेशनच्या वतीने साजरा होणार आहे.

विवाहसोहळ्याचे तीसरे वर्षे आहे. राहुल जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी जपत गेली ३ वर्षे राहुलदादा जाधव स्पोर्ट फौंडेशनच्या वतीने या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. पहिल्या वर्षी २२, गेल्या वर्षी ५५ विवाह लावण्यात आले आहेत. यावर्षी कमीतकमी १०१ विवाह लावण्याचे स्पोर्ट फौंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.

या विवाह सोहळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शुल्क वधू वरांकडून घेतले जात नाहीत. तसेच, सोहळ्यामध्ये सर्व धार्मिक विधी साखरपुडा हळदी समारंभ इत्यादी विधिवत केले जातात. नवदांपत्यास संपूर्ण पोशाख तसेच संसारउपयोगी वस्तु मोफत दिल्या जातात. या विवाहसोहळयानिमित्त विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यामध्ये राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरिष बापट, मंत्री राम शिंदे, आमदार
महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप तसेच प. पू आण्णासाहेब मोरे उपस्थित राहणार आहेत. ज्यांना या विवाह सोहळयामध्ये नाव नोंदणी करावयाची असेल त्यांनी राहुल जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी महापौर राहुल जाधव यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button