breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

फेसबुक, ट्विटरपाठोपाठ गुगलचा दणका; ट्रम्प यांचे YouTube अकाऊंट बंद

वॉशिंग्टन – अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुक आणि ट्विटरपाठोपाठ गुगलनेही दणका दिला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलच्या मालकीच्या यूट्यूबने आज ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे म्हटले आहे.

वाचा:-अमेरिकेत कमला हॅरिस यांच्या फोटोवरून वाद

यूट्यूबने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, ‘सध्या सुरू असणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आम्ही डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला नवीन कंटेट (व्हिडीओ) काढून टाकला आहे. हा कंटेट आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा आहे.’ तसेच ‘या चॅनेलवरुन आता ‘किमान’ सात दिवस नवीन कंटेट अपलोड करता येणार नाही’, असेही युट्यूबने म्हटले आहे. याचा अर्थ आता ट्रम्प अध्यक्षपदावर असेपर्यंत यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोणताही व्हिडीओ अपलोड करु शकत नाहीत. आजपासून सात दिवसांनी म्हणजेच येत्या २० जानेवारी रोजी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे.

दरम्यान, ट्रम्प समर्थकांकडून अमेरिकेच्या ‘संसदे’वरील हल्ल्यानंतर ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले. तसेच अमेरिकेतील स्ट्राईप या ऑनलाईन पेमेंट सेवाप्रदात्या कंपनीने ट्रम्प यांच्याशी संबंधित व्यवहार थांबविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button