breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“सरकार चालवताय की दाऊदची गँग?”; आशिष शेलार महाविकास आघाडीवर संतापले!

मुंबई |

“अनिल देशमुख प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्तांनीच चक्क सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकावले. राज्यात फक्त आणि फक्त काय”द्यायचे” राज्य आहे का? तिघाडी मिळून, सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय?” असा सवाल करत, भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर संताप व्यक्त केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील गुन्ह्याच्या तपासाप्रकरणी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करण्याबाबतच सरकारकडून सहकार्य केले जात नाही. उलट सहाय्यक पोलीस आयुक्ताकडून आमच्या अधिकाऱ्यांना धमकावले जात असल्याचा आरोप सीबीआयने गुरुवारी उच्च न्यायालयात के ला. न्यायालयानेही त्याची दखल घेत राज्य सरकारला या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून शेलार यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

तर, सध्या ठाकरे सरकार व राज्यपाल यांच्यातील वादाच्या नव्या अध्यायास मागील काही दिवसांपासून सुरूवात झाल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून राज्यपालांवर टीका केली जात आहे. शिवाय, राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीतही राज्यपालांच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त केली गेली आहे. यावरूनही भाजपा नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

“राज्यपाल आणि विरोधीपक्ष नेते अडचणीत असलेल्या जनतेला भेटायला गेले, तर सरकारच्या पोटात कळ येते. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप असलेल्या पोलीस बदल्या भ्रष्टाचार प्रकरणातील कागदपत्रे सीबीआयला राज्य सरकार देत नाही.न्यायालयाचे आदेशही मानत नाहीत.” असे शेलारांनी म्हटले आहे. तसेच, “सरकार विरोधात लिहिले म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडला. मंत्र्यांना प्रश्न विचारले तर ठाण्याच्या करमुसे सारख्यांना जीव जाईपर्यंत मारले. आमदारांनी विधानसभेत ओबीसी विषयावर खडा सवाल केला तर आमदांना निलंबित केले.” असंही आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button