breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

कोरोनामुळे कुस्तीपटू दीपक पुनिया होम क्वारंटाइन

नवी दिल्ली | कोरोनाची बाधा झाल्यामुळे कुस्तीपटू दीपक पुनिया होम क्वारंटाइन होणार आहे. ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला पुनिया सोनीपत येथील राष्ट्रीय सराव शिबिरात दाखल झाला होता. महामारीच्या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्रासाठी कोविड प्रोटोकॉल लागू आहे. या प्रोटोकॉलनुसार सोनीपत सेंटरमध्ये त्याची कोरोना चाचणी झाली. या चाचणीत दीपकला कोरोना झाल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी त्याला होम क्वारंटाइनचा सल्ला दिला.

कोविड प्रोटोकॉलनुसार सोनीपत सेंटरमध्ये सराव सुरू करण्याआधी प्रत्येक खेळाडूची कोरोना चाचणी घेतली जाते. या नियमानुसार कोरोना चाचणी केल्यावर दीपकला कोरोना झाल्याचे लक्षात आले. सेंटरमधून त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती स्थिर असल्यामुळे डॉक्टरांनी काही तासांनंतर आवश्यक ती काळजी घेण्यासाठी सूचना देऊन दीपकला होम क्वारंटाइनचा सल्ला दिला आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला.

बरा झाल्यावर वैद्यकीय सल्ल्याने दीपक पुन्हा सोनीपत सेंटरमध्ये जाऊ शकेल. सेंटरमध्ये पुन्हा एकदा त्याची कोरोना चाचणी होईल. ही चाचणी निगेटिव्ह आली तर तो सेंटरमध्ये राहून सराव करू शकेल. दीपक व्यतिरिक्त आणखी दोन भारतीय कुस्तीपटू कोरोनाबाधीत झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणाऱ्या दीपकने होम क्वारंटाइन होण्यासाठी झज्जरच्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती खबरदारी घेऊन घरी जाणार आणि तिथे होम क्वारंटाइन होऊन विश्रांती तसेच उपचार घेणार असल्याचे तो म्हणाला. दीपकच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा निष्कर्ष अद्याप आलेला नाही.

मात्र डॉक्टरांनी त्याला होम क्वारंटाइनचा सल्ला दिला आहे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करणार असल्याचे दीपकने सांगितले. कोरोनाची बाधा झाली असली तरी अद्याप कोरोनाची लक्षणे जाणवली नसल्याचेही त्याने सांगितले. कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने २१ सप्टेंबरपासून स्टेडियममध्ये जास्तीत जास्त १०० प्रेक्षकांना खेळ बघण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना प्रेक्षकांमध्ये सोशल डिस्टंस राखण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित खेळाच्या व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात आली आहे. प्रेक्षकांना मास्क घालून तसेच सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यानंतरच स्टेडियममध्ये प्रवेश मिळेल. याआधी प्रत्येक प्रेक्षकाची किमान वैद्यकीय तपासणी होईल. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्याचे आढळल्यास अथवा कोरोनाशी संबंधित लक्षणे आढळल्यास त्याला तातडीने वैद्यकीय मदत देण्याची जबाबदारी खेळाच्या व्यवस्थापन समितीची असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button