breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

Iqbal Singh Chahal: ‘माझी अमेरिकेत कोणतीही संपत्ती नाही’; चहल यांनी ‘ते’ आरोप फेटाळले

मुंबई:मोहित कंबोज ( Mohit Kamboj ) यांनी माझ्यावर केलेले आरोप निराधार असून हा मला वादात ओढण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या राजकीय लढ्यात ते मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दुर्दैवी आहे. माझी अमेरिकेत कोणतीही संपत्ती नाही. कंबोज यांनी या आरोपावर अचूक तपशीलांसह माहिती द्यावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल ( Iqbal Singh Chahal ) यांनी कंबोज यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

समीत ठक्कर यांनी चार मार्च २०२२ रोजी केलेल्या ट्वीटमध्ये प्राप्तीकर विभाग माझी वैयक्तिक चौकशी करण्यासाठी सज्ज असल्याचा खोडसाळ आणि चुकीचा दावा केला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात त्वरित पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कंबोज यांनी नमूद केलेली प्राप्तीकर विभागाची नोटीस ही यशवंत जाधव यांच्याशी संबंधित प्रकरणाबाबत आहे. या प्रकरणात सन २०१८ पासून मुंबई पालिकेकडून माहिती मिळविण्याची ती एक नियमित सूचना आहे तसेच ही केवळ माहितीची आंतर-विभागीय देवाणघेवाण आहे. या सूचना येतात आणि योग्य स्तरावर उत्तरे दिली जातात. कंबोज हे मला बदनाम करण्यासाठी वस्तुस्थितीच्या विपरीत माहिती देत असून हे दुर्दैवी आहे. कंबोज यांना विनंती करतो की त्यांनी आपली राजकीय लढाई राजकीय पातळीवर लढावी. अधिकार्‍यांना यात ओढू नये. सत्याचा नेहमी विजय होईल, असे चहल यांनी स्पष्ट केले आहे.

कंबोज यांनी केला हा आरोप

इक्बालसिंह चहल यांची अमेरिकेत कोट्यवधींची संपत्ती असल्याचा दावा करत याबाबत येत्या आठवड्याभरात प्राप्तीकर विभागाकडे माहिती देणार असल्याचे मोहित कंबोज यांनी सांगितले होते. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याशीही चहल यांचे साटेलोटे आहे. जाधव यांची प्राप्तीकर विभागाकडून चौकशी सुरू असून त्या प्रकरणात चहल यांना नोटीस पाठवली होती. मात्र ते चौकशीला हजर राहिले नाहीत. ही बाब खटकणारी असून अधिकारी कुणीही असोत त्याची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी कंबोज यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button