breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

दुबईत भीषण अपघातात आठ भारतीयांचा मृत्यू

दुबईत बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये आठ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे. ६ जून रोजी गुरुवारी हा अपघात झाला. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बसमधून एकूण ३१ प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राशीदिया एक्झिटजवळ असताना बसने सिग्नल तोडला असता हा अपघात झाला.

या अपघातात एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वेगवेगळ्या देशातील नागरिकांचा समावेश आहे. पाच जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. जखमींना तात्काळ दुबईमधील राशीद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे चार भारतीयांना प्राथमिक उपचार करुन सोडून देण्यात आलं. काही जखमींवर अद्याप उपचार सुरु आहे.

ANI

@ANI

Indian Consulate Dubai: Sorry to inform that as per local authorities&relatives it is so far confirmed that 8 Indians have passed away in Dubai bus accident.Consulate is in touch with relatives of some of the deceased & awaits further details for others to inform their families.

ANI

@ANI

Indian Consulate Dubai: We have been told by local authorities that 6 Indians are confirmed dead in Dubai bus accident. However, this number may go up as 8 bodies are still not identified.4 Indians were discharged after first aid &three are receiving treatment in Rashid hospital.

44 people are talking about this

स्थानिक प्रशासनाने भारतीय दुतावासाला आठ भारतीयांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. सर्व मृतांची ओळख पटली आहेत. राजगोपालन, फिरोज खान पठाण, रेशमा फिरोज खान पठाण, दीपक कुमार, जमालुद्दीन, किरण जॉनी, वासुदेव आणि तिलकराम ठाकूर अशी त्यांची नावे आहेत.

मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांच्या संपर्कात आपण असल्याची माहिती भारतीय दुतावासाकडून देण्यात आली आहे. त्यांनी हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे. ट्विटमध्ये मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. आमचे अधिकारी संजय कुमार (+971-504565441or +971-565463903) यांच्याशी संपर्क साधू शकता अशी माहिती ट्विटमध्ये देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button