breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : पंजाब आणि राजस्थान संघात आज ‘करो या मरो’

अबूधाबी – आयपीएलच्या प्ले ऑफ शर्यतीत घोडदौड करीत असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात आज शेख जायेद स्टेडियमवर ‘करो या मरो’चा सामना रंगणार आहे. यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या सातपैकी सहा लढती गमावून त्यानंतर सलग पाच सामने जिंकल्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीत अद्यापही टिकून आहे. त्यामुळे आज होणाऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्स त्यांचा विजयरथ रोखणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. या दोन्ही संघांना स्पर्धेतील पुढचा प्रवास करण्यासाठी हा सामना जिंकण्याशिवाय अन्य पर्याय नाही.

पंजाबने मागील पाच सामन्यात शानदार प्रदर्शन करत स्पर्धेतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता जर त्यांनी उर्वरित दोन सामने जिंकले तर हा संघ प्ले ऑफमध्ये जाऊ शकतो. तसा राजस्थानसाठी मात्र हा रस्ता तितकासा सोपा नाही. या संघाला दोन्ही सामने तर जिंकावे लागतीलच शिवाय पंजाब, कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांच्या पराभवावरदेखील त्यांचे प्ले ऑफमधील स्थान अवलंबून आहे.

सध्या पंजाबचा संघ १२ सामन्यात १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे तर राजस्थान रॉयल्स १२ सामन्यात १० गुणांसह सातव्या स्थानी आहे. आजची लढत दोन्ही संघांसाठी ‘करा अथवा मरा’ अशा धर्तीची आहे. त्यामुळे आज कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button