breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020: दिल्लीचा चेन्नईवर पाच विकेट्स राखून विजय

शारजा – शिखर धवनचे धडाकेबाज शतक आणि अक्षर पटेलने अखेरच्या षटकांत फटकावलेल्या तीन षटकारांच्या जोरावर श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सने महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. चेन्नईने दिल्लीला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने 1 चेंडूआधी 5 विकेट गमावून पूर्ण केले. दिल्लीने 185 धावा केल्या. या सामन्यात शिखर धवनने आयपीएलमधील पहिलंवहिलं शतक झळकावलं.

सामन्याच्या सुरुवातीला चेन्नईने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र फलंदाजी करताना चेन्नईची खराब सुरुवात झाली. सॅम करन पहिल्या षटकात तिसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. यानंतर दुसऱ्या विकेटसाठी शेन वॉटसन आणि फॅफ डु प्लेसिसने 87 धावांची भागीदारी केली. यानंतर शेन वॉटसन 36 धावावंर बाद झाला. मग अंबाती रायुडू मैदानात आला. रायुडू आणि फॅफची चांगली जोडी जमले. यादरम्यान फॅफने अर्धशतक पूर्ण केले. मात्र 58 धावांवर तो बाद झाला. त्याने या खेळीत 2 षटकार आणि 6 चौकार लगावले. तर धोनीने मात्र या सामन्यातही निराशा केली. तो 3 धावांवर बाद झाला. यानंतर अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजाने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शेवटच्या 21 चेंडूत या जोडीने 50 धावांची भागीदारी केली. या दरम्यान रवींद्र जडेजाने फटकेबाजी केली. रवींद्र जडेजाने 13 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी केली. यात त्याने 4 षटकार लगावले. चेन्नईने 4 विकेट गमावून 20 षटकांत 179 धावा केल्या. चेन्नईकडून फॅफ डु प्लेसिसने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर अंबाती रायुडूने नाबाद 45 धावांची खेळी केली. तर दिल्लीकडून एनरिच नोर्तजने सर्वाधिक 2 विकेट्स घेतले आणि खगिसो रबाडा व तुषार देशपांडे या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तसेच विजयी आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या दिल्लीची निराशाजनक सुरुवात झाली. दिल्लीला पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर पहिला झटका बसला. पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला. यानंतर दिल्लीला दुसरा धक्का 26 धावांवर मिळाला. अजिंक्य रहाणे 8 धावांवर बाद झाला. रहाणेनंतर कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात आला. अय्यर आणि धवनने तिसऱ्या विकेटसाठी 68 धावा जोडल्या. मात्र ड्वेन ब्राव्होला ही जोडी फोडण्यात यश आले. त्याने श्रेयसला 23 धावांवर बाद केले. मग ‘गब्बर’ शिखर धवन मैदानात तंबू ठोकून उभा राहिला. अय्यरनंतर मार्कस स्टोइनिस मैदानात आला. धवन आणि मार्कस या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावा जोडल्या. मार्क्स स्टोइनिस 24 धावांवर बाद झाला. यानंतर आलेला ऍलेक्स कॅरीही बाद झाला. यादरम्यान धवनने आयपीएलमधील पहिलं शतकं पूर्ण केलं. ऍलेक्सनंतर अक्षर पटेल मैदानात आला. अक्षर पटेलने धमाकेदार खेळी केली. अक्षरने षटकार खेचत दिल्लीला विजय मिळवून दिला. शिखर धवनने 58 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. याखेळीत त्याने 14 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर अक्षर पटेलने 5 चेंडूत धमाकेदार नाबाद 21 धावा केल्या. तसेच चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या आणि सॅम करन, शार्दूल ठाकूर व ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button