breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

चंद्रपुरात नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी बकरीऐवजी कर्मचार्‍यालाच पिंजर्‍यात बसवले

चंद्रपूर – नरभक्षक वाघ किंवा बिबट्याला बेशुद्ध करून पकडले जाते नाहीतर बकरीचे आमिष दाखवून जेरबंद केले जाते. राजुरा तालुक्यात दहा जणांचे बळी घेणारा आर टी 1 वाघ या प्रयोगाला जुमानत नसल्याने वनविभागाने चक्क बकरीऐवजी आपल्या विभागातील कर्मचार्‍यांनाच पिंजर्‍यात बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पिंजर्‍यात कोण कितीवेळ बसणार याचे वेळापत्रक वनविभागाने तयार केले आहे. सायंकाळी 6 ते सकाळी 8 असे तब्बल 14 तास त्यांना पिंजर्‍यात बसवले जात आहे. राजुरा वनक्षेत्रात 11 ऑक्टोबरपासून हा प्रयोग राबवला जात आहे. तरीही वाघ पिंजर्‍यात बसलेल्या वनपाल, वनरक्षक वा वनमजुराजवळ फिरकला नसल्याचे समजते. राजुरा वनक्षेत्रासह परिसरातील वनक्षेत्रात आर टी 1 वाघाने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या वाघाने दहा जणांचा बळी घेतला आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला जेरबंद करा वा ठार मारा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या मागण्यांसाठी दोन दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनही केले होते. त्यामुळे हतबल झालेल्या वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी बकरीऐवजी कर्मचार्‍यांनाच पिंजर्‍यात बसवावे लागत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button