breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यात दिवसभरात २७९ कोरोना रुग्णांची वाढ

पिंपरी । प्रतिनिधी

पुणे शहरात कोरोना बाधित रुगांची संख्या वाढत आहे.  मंगळवारी दिवसभरात २७९ रुग्णांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर दिवसभरात २२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलं आहे. पुण्यात करोनाबाधीत ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तीन रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. ४१२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात २४७ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. एकूण पॉझिटिव्ह रूग्ण संख्या १ लाख ७२ हजार ५५९ झाली आहे.  

पुणे शहरात कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण वाढत आहेत. आजपर्यंत एकूण १ लाख ६२ हजार ९७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज २४२५ स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. वाढत्या रुग्ण संखेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button