breaking-newsक्रिडा

IPL 2019: बोली लागताच वेस्ट इंडिजच्या `या` खेळाडूने मानले देवाचे आभार

आयपीएलमध्ये खेळाडूंच्या लिलावापासून ते मैदानापर्यत सर्वच ठिकाणी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा नेहमीच दबदबा राहिला आहे. 2019 च्या आयपीएल लिलावात देखी वेस्ट इंडिज खेळाडू निकोलस पूरन (4.2 कोटी) , कारलोस ब्रेथवेट (5 कोटी), शिमराॅन हेटमेयर  (4.2 कोटी )  यांच्यासाठी  बोली लागली. यंदाच्या आयपीएलमध्ये देखील वेस्ट इंडिजच्या खेळाडूंवर सर्वांचेच लक्ष असणार आहे.

लिलावात बोली लागलेल्या वेस्ट इंडिजच्या शिमराॅन हेटमेयरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा बोली लागत होती तेव्हा हिटमेयर हाॅटेलच्या रूममध्ये बसून लिलाव पाहत होता. बोलीच्या वेळी त्याचे नाव येताच त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य बघण्यासारखे होते. राॅयल चॅलेजर्स बॅंग्लोरने त्याला 4.2 कोटीमध्य़े खरेदी करताच त्याने उठून देवाचे आभार मानले आणि आनंद साजरा केला.

Embedded video

हिटमेयर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहे. यंदा तो विराट कोहलीच्या राॅयल चॅंलेंजर्स बॅंग्लोरकडून खेळताना दिसेल. भारत विरूध्दच्या मालिकेत हिटमेयरने शानदार कामगिरी केली. एक शतक व 94 धावांची खेळी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button