breaking-newsक्रिडा

‘हे’ आहेत आयपीएलच्या १२ व्या पर्वातले सर्वात महागडे खेळाडू

जयपूरमध्ये झालेला आयपीएलच्या १२ व्या पर्वासाठी अनेक भारतीय खेळाडू मालामाल झाले असले तरी वरूण चक्रवर्ती हा खेळाडू चर्चेचा विषय ठरला. तामिळनाडू संघाकडून क्रिकेट खेळणाऱ्या वरून चक्रवर्तीला तब्बल ८ कोटी ४० लाख रुपयांची बोली लावून किंग्स इलेव्हन पंजाब संघाने त्याला आपल्या संघात घेतलं आहे. वरून चक्रवर्ती हा मिस्ट्री स्पिनर असून ‘टीएमपीएल’ स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्याने त्याला इतकी किंमत दिल्याचे बोलले जात आहे. या लिलावात अनेक नवोदित खेळाडूंना मागणी असल्याचे पाहावयास मिळाले.

आयपीएलच्या १२व्या पर्वाचा हा वर्षातला दुसऱ्यांदा होणार लिलाव आहे .जाणून घेऊयात कोण आहेत या सिझनमध्ये सर्वाधिक बोली लागलेले १० खेळाडू…

 वरुण चक्रवर्ती 
तामिळनाडूचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याला सर्वाधिक ८ कोटी ४० लाख रुपयांना किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने खरेदी करत सर्वानाच धक्का दिला.टी एमपीएल स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्याने त्याला इतकी किंमत दिल्याचे बोलले जात आहे.


 

 

जयदेव उनाडकट
पाठीमागच्या सिझनमध्ये तब्बल ११ कोटी ५० लाख रुपयाची बोली लागलेल्या जयदेव उनाडकटला याही सिझन मध्ये ८ कोटी ४० लाखाची बोली लागली. याही सिझन मध्ये तो राजस्थान रॉयल्स कडूनच खेळणार आहे.


सॅम करन
इंग्लंडचा सॅम करनला ७ कोटी २० लाखांची बोली लावून पंजाब किंग्ज इलेव्हन संघाने खरेदी केले आहे. सॅम करनचा हा पहिलाच सिझन असून त्याने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेट मध्ये उत्तम कामगिरी केली होती. याच कारणामुळे त्याला तब्बल ७ कोटी २० लाखांची बोली लागली आहे.


 

कॉलिन इन्राग
‘बिग बॅश लिंग मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या कॉलिन इन्रागला दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ कोटी ४० विकत घेतले. कॉलिन इन्राग हा खेळाडू दक्षिण आफ्रिका संघाकडून खेळतो.


शिवम दुबे

मुंबईकर शिवम दुबेने रणजीमध्ये एकाच षटकात ५ षटकार मारल्यामुळे त्याने संघ मालकाचे लक्ष आपल्याकडे वळवण्यात तो यशस्वी झाला. शिवमला विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ५ कोटींची बोली लावून आपल्या संघात घेतले.


 

मोहित शर्मा

मोहित शर्माला धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५ कोटीत विकत घेतले. विशेष म्हणजे त्याने आयपीएलमध्ये याच संघाकडून सुरुवात केली होती.मोहित शर्माला बऱ्याच वर्षांनी घर वापसी करण्याची संधी मिळनार आहे.


अक्षर पटेल
किंग्स इलेव्हन पंजाब कडून खेळणाऱ्या अक्षर पटेलला ५ कोटींची बोली लावत दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला विकत घेतले. तो या वर्षी दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.


कार्लोस ब्रेथवेटला

वेस्ट इंडिजचा कॅप्टन कार्लोस ब्रेथवेटला कोलकाता नाईट रायडर संघाने ५ कोटीत खरेदी केले. त्याची बेस प्राईज ७५ लाख रुपये होती.

 


मोहम्मद शमी

कसोटी क्रिकेटमध्ये आपला जळवा दाखवणाऱ्या मोहम्मद शमीला खरेदी करण्यासाठी अनेक संघमालक इच्छुक असल्याचे पाहावयास मिळाले. चेन्नई, दिल्ली,पंजाब, राजस्थान या संघामध्ये चढाओढ पाहायला मिळाली. बाराव्या हंगामात मोहम्मद शमी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार आहे.असून त्याला ४ कोटी ८० लाखांची बोली लागली.


शिमरॉन हेटमायर
वेस्ट इंडिजला १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून देणारा तसेच भारताविरुद्ध उत्तम कामगिरी करत आपला जळवा दाखवणारा शिमरॉन हेटमायर विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने विकत घेतले. हेटमायरला ४ कोटी २० लाख रुपयांची बोली लागली.


अक्षदीप नाथ

अक्षदीप नाथला रॉयल चैलंजर्स बेंगलोर संघाने ३ कोटी ६० लाखाला खरेदी केले. अक्षदीप नाथ हा खेळाडू उत्तर प्रदेश संघाकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. त्याने २०१२ च्या १९ वर्षंखालील विश्वचषक स्पर्धेत उपकर्णधार म्हणून भूमिका त्याने पार पाडली.


बरिंदर सारं

जलदगती गोलंदाज बरिंदर सारंला मुंबई इंडियंस ३ कोटी ४० लाखाला खरेदी केले. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.


वरुण आरोन

वरुण आरोनला राजस्थान रॉयल्स संघाने २कोटी ४० लाखाला खरेदी केले. त्यानेही भारताचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.


जॉनी बेयरस्टोला

जॉनी बेयरस्टोला सनराइजर्स हैदराबाद २ कोटी २० लाख रुपयात खरेदी केले आहे. जॉनी बेयरस्टो हा इंग्लड संघाचा महत्वाचा खेळाडू असून त्याने अनेक आक्रमक इनिग्स खेळल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button