breaking-newsराष्ट्रिय

INX Media प्रकरणी पी. चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर, 106 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर येणार

नवी दिल्ली | INX Media घोटाळाप्रकरणी गेल्या 106 दिवसांपासून दिल्लीतील तिहार जेलमध्ये असेलले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने दोन लाखांच्या जातमुचलक्यावर पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे. यावेळी चिदंबरम यांना ईडीला चौकशीत संपूर्ण सहकार्य करण्याचं आणि देशाबाहेर न जाण्याची अट सुप्रीम कोर्टानं घातली आहे.

मागील 106 दिवसांपासून पी. चिदंबरम हे तिहार तुरुंगात होते. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात पी. चिदंबरम यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. पण याआधीचं सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button