breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठिंबा हिच राष्ट्रवादीची भूमिका, सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करु : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा आणि विधानपरिषद आमदार आणि राज्यसभा आणि लोकसभा खासदारांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. राज्यात जी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे ती पाहता महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत हे सरकार कसं टिकेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.

मी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. आदित्य ठाकरे यांच्याशी देखील बोललो आहे, असं अजित पवार म्हणाले. आमची यापेक्षा कसलिही वेगळी भूमिका नाही,असं अजित पवार म्हणाले. शिवसेना नेते प्रवक्ते याविषयी सांगतील. सेनेचे कैलास पाटील, नितीन देशमुख असतील ते परत आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांना आवाहन केलं आहे. महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलेला आहे. आमचे सर्व आमदार आमच्या भूमिकेशी सहमत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

  • समोरासमोर सांगितलं असतं तर प्रश्न सोडवला असता

आमचे सहकारी पक्ष काही वक्तव्य केलं आहे. सरकार आल्यानंतर अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. पालकमंत्रिपद तिन्ही पक्षांनी समान प्रमाणात घेण्यात आली.विकास कामांच्या बाबतीत मी कधी दुजाभाव केला नाही, असं अजित पवार म्हणाले. माध्यमांशी बोलण्याऐवजी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील यांच्या बैठकीत एकत्र असताना सांगितलं असतं तर प्रश्न तिथल्या तिथं सोडवलं असतं, असं अजित पवार म्हणाले.

  • सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करणार

महाविकास आघाडीचं सरकार १७० मतांच्या पाठिंब्यावर आलं होतं. जो मतदार संघ ज्या पक्षांचा आमदार असेल तिथं आपण हस्तक्षेप करायचा नाही, असं ठरलं होतं. आमदार एका पक्षाचा आणि नगरपालिका एका पक्षाची असं असल्यास काही झालं असेल, असं अजित पवार म्हणाले आहेत.

संजय राऊत यांच्या नेतृत्त्वात आम्ही महाविकास आघाडीत गेलो. सरकार टिकवण्याची तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे. सरकार टिकवण्यासाठी तिन्ही पक्ष मिळून प्रयत्न करुन यातून बाहेर पडू यासाठी प्रयत्न करु, असं अजित पवार म्हणाले.

संजय राऊत यांनी पाच वर्ष नाही तर पंचवीस वर्ष सरकार टिकेल, असंही वक्तव्य केलं आहे. कोणत्या स्थितीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे हे मला माहिती नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन आणि त्यांच्या मनात काही आहे का यासंदर्भात विचारेन, असं अजित पवार म्हणाले.

  • उद्धव ठाकरेंच्या सोबत राहणार

पक्षाच्या बहुतांश आमदारांचा निर्णय असल्यास पक्षाला निर्णय घ्यावा लागतो. आम्ही शेवटपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहू, असं अजित पवार म्हणाले. ही आताची परिस्थिती निर्माण झाली आहे यातून सरकार पुढं चालवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्रयत्न करतील, असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय वाद निर्माण झाल्यास तो राष्ट्रवादी काँग्रेसनं सोडवला पाहिजे. शिवसेनेचा तो पक्षांतर्गत विषय आहे, आम्ही त्यावर काही बोलणार नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस वाढत असं त्यांना वाटत असेल तर एकनाथ शिंदे यांनी संयुक्त बैठकीत त्यांनी सांगायला हवं होतं. तीन पक्षांची आघाडी असल्यानं काही झालं असल्यास त्यांनी सांगायला हवं होतं, असं अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button