breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीतर्फे सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन साजरी

पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटीत कामगार विभाग पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्या वतीने रक्षाबंधन साजरी करण्यासाठी काश्मिरच्या सीमेवरील जवानांसाठी राख्या पाठविण्यात आल्या.

 

रक्षाबंधन हा हिंदू धर्मात सण साजरा केला जातो. यानिमित्त देशभरातील महिलांकडून देशाचे रक्षण करणा-या सीमेवरील जवानांना राख्या पाठविल्या जातात. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी हा उपक्रम साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंघटीत कामगार विभाग पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्या वतीने गेल्या एक महिन्यापासून राख्या बनविण्यास सुरूवात करण्यात आली होती. वेळेत राख्या सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट खात्याच्या अत्यावश्यक सेवेद्वारे राख्या सीमेवर पाठविण्यात आल्या.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी असंघटीत कामगार विभाग पुणेच्या अध्यक्षा मीना मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या उपक्रमात उपाध्यक्षा जयश्री प्रसाद, सविता खराटे, पुणे शहराध्यक्ष राहूल जाधव, योगेश घुले यांच्यासह अनेक महिलांनी राख्या बनविण्यासाठी सहकार्य केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button