breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

मोठी बातमी, मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती

मुंबई : आजच्या दिवसातील सर्वांसाठी सकारात्मक बातमी म्हणजे मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनाचे सर्व निकष पूर्ण झाले आहेत. केरळमधील ६० टक्के पर्जन्यमापक केंद्रांवर पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी मान्सून १ जूनला केरळमध्ये दाखल होतो. मान्सून १६ मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला होता. हवामान विभागानं यंदा मान्सून वेळे अगोदर केरळमध्ये दाखल होईल, असं म्हटलं होतं. त्याप्रमाणं मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील सहा ते सात दिवसांमध्ये तळकोकणात आणि महाराष्ट्रात दाखल होत असतो. त्या अंदाजानुसार मान्सून महाराष्ट्रात ७ ते ८ जूनपर्यंत दाखल होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा वरुणाराजा वेळेआधी दाखल झाला आहे. हा वेग कायम राहिल्यास पुढील सात दिवसात महाराष्ट्रातील तळकोकणात मान्सून दाखल होऊ शकतो. ७ ते ८ जून पर्यंत मान्सून मुंबई किंवा पुण्यात दाखल होऊ शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button