breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Rishabh Pant : भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला जबर दुखापत

पंतच्या अपघाताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल

दिल्ली : भारतीय संघाचा खेळाडू ऋषभ पंत याच्या गाडीचा आज भीषण अपघात झाला आहे. तो दिल्लीहून घरी निघाला असता हम्मादपूर झालजवळ रूरकीच्या नरसन सीमेवर त्याच्या गाडीचा अपघात झाला आहे. सध्या त्याच्यावर डेहराडूनच्या मॅक्स रूग्नालयात उपचार सुरू आहेत. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.
ऋषभ पंतची गाडी रस्त्याकडेला असणाऱ्या रेलिंगला धडकली. त्यानंतर त्याच्या गाडीने पेट घेतला. पंत यातुन सुखरूप बाहेर पडाला. दिल्ली रोडवरील सक्षम रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. ऋषभ आपल्या मर्सिडिज गाडीमध्ये घरी निघाला होता. गाडीचा नंबर डीएल 10 सीएन 1717 असा आहे.
पंत स्वत: गाडी चालवत होता. तसेच त्याच्यासोबत काही मित्र देखील होते. पण त्याबाबत अधिक माहिती अज्ञाप मिळालेली नाही. अपघात झाला त्या वेळी स्थानिकांनी तातडीने 108 रूग्णवाहिकेला फोन केला. त्याला रूकडी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात इतका भीषण होता की गाडीचा एकही पार्ट उरलेला नाही. पंतच्या अपघाताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात त्याची दुखापत किती गंभीर आहे हे दिसत आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या कपाळावर आणि पायाला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे, त्याला रुरकीहून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button