breaking-newsराष्ट्रिय

…अन, ताफा थांबवून मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्त तरुणाची केली मदत

गोवा | महाईन्यूज

पेशाने डॉक्टर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्त तरूणाची मदत केली आहे. गुरूवारी दुपारी पोंडा शहरापासून ३५ किमी असलेल्या खांडेपार येथे ही मुख्यमंत्र्यांनी कौतुकास्पद काम केलं आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत संजीवनी सहकारी साखर कारखान्यासंदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी जात होते. त्यावेळी खांडेपार पूलावर एक दुचाकी चालक अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला अन त्यावेळी त्यांच्यातील डॉक्टर जागा झाला अन् त्यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्या तरूणाची आस्थेने चौकशी केली आहे.

तसेच तात्काळ अपघातग्रस्त तरुणाला उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले होते. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे काही क्षणातच रूग्णवाहिका घटनास्थळावर पोहचली होती. जखमी तरूणाला तात्काळ रूग्णालयात नेण्यात आले आहे या कौतुकास्पद कामगिरीमुळे खांडेपार आणि आजूबाजूच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, याआधीही मुख्यमंत्री प्रमोद सावंत दोन वेळा रस्त्यात अपघातग्रस्त चालकांना ताफा थांबवून मदत केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button