breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

PMPML बस चालकानं बस रिव्हर्स घेत गाड्यांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल..

पुणे : पुण्यात PMPML बस चालकानं वाहनांना उडवलं आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडवरची ही दुर्घटना आहे. बस चालकाने दारू पिऊन बस चालवली असल्याचं समजत आहे. तो गाडी चालवत असताना बसमध्ये तब्बल ५० प्रवासी होते. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

PMPML चालकाचा काही गाडी चालकासोबत वाद झाला होता. त्यावेळी त्याने बस आधी समोर घेतली मात्र त्यानंतर त्याचा राग अनावर झाल्याने त्याने थेट बस रिव्हर्स घेतली. हे पाहून पुण्यातील सेनापती बापट रोडवरील लोकांनी आरडा ओरड सुरु केली. मात्र या सगळ्याला न जुमानता बस चालकाने थेट बस मागे घेत अनेक गाड्यांना उडवलं.

हेही वाचा – ‘मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला माझा विरोधच’; रामदास कदम यांचं विधान 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश सावंत हा पीएमपीएमएल बस चालक आहे. तो शनिवारी पीएमपीएमएलची बस क्रमांक एमएच १४, एचयु ५७२५ हे घेऊन पुणे विद्यापीठाच्या दिशेने जात होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button