breaking-newsराष्ट्रिय

एचडीएफसी बँकेचे नवे सीईओ शशिधर जगदिशन

नवी दिल्ली – भारताच्या खासगी बँकिंग क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या सीईओपदी शशिधर जगदीशन यांची नियुक्ती केली जाणार आहे. २६ ऑक्टोबर रोजी बँकेचे विद्यमान सीईओ आदित्य पुरी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्याजागी जगदीशन यांची नियुक्ती झाली आहे.

खासगी क्षेत्रातील बँकांच्या सीईओची निवृत्तीची वयोमर्यादा ७० वर्षांची आरबीआयने ठरवली आहे. त्यानुसार पुरी हे सेवानिवृत्त होणार आहेत. यामुळे एचडीएफसी बँकेच्या समभागांमध्ये आज चार टक्क्यांची वाढ झाली होती. एचडीएफसीच्या सीईओपदी नेमणूक करण्यासाठी बँकेने त्यांच्या नावाचा प्रस्ताव आरबीआयकडे पाठवला होता. त्याला आरबीआयने मंजुरी दिली आहे. एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेच्या या पदासाठी शशिधर जगदीशन, कैजाद एम. भरुचा आणि सुनील गर्ग यांच्या नावाची चर्चा झाली. त्यात जगदीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. १९९६पासून ते या बँकेशी संबंधित आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button