Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशातील सर्वांत मोठ्या जिओच्या कन्व्हेन्श सेंटरचे उद्घाटन

देशातील सर्वांत मोठ्या जिओच्या कन्व्हेन्शन सेंटरचे आज उद्घाटन झाले आहे. मुंबईच्या बांद्रा कुर्ला भागात हे सेंटर असून १८.५ एकर परिसरात हे सेंटर पसरले आहे. रिलायन्स समूहाच्या संचालक आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. महत्त्वाचं म्हणजे २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीची बैठक याच सेंटर मध्ये होणार आहे.

या सेंटरचे वैशिष्ट्य

सांस्कृतिक केंद्र, संगीत कारंजे, रिटेल शॉप्स, कॅफे, रेस्टॉरंटसह सर्व्हिस अपार्टमेंट, ऑफिसेससाठी या जिओच्या कन्व्हेन्शन सेंटरचा उपयोग होणार आहे.

हे सेंटर ५ एकर जागेवर पसरलं आहे.

२ कन्व्हेन्श सेंटरमध्ये १० हजार ६४० लोक एकत्र बसू शकतील.

या सेंटरमधील तीन प्रदर्शनी हॉल १ लाख ६१ हजार वर्ग फूटपेक्षा जास्त मोठे आहे.

या सेंटरमध्ये फाईव्ह जी सेवा उपलब्ध असेल.

५ हजार पार्किंग आणि १८ हजार लोकांसाठी भोजन व्यवस्था असेल.

३२०० पाहुण्यांसाठी बॉलरुम आणि २५ मीटिंग्स रुम्सही उपलब्ध असतील.

या सेंटरचे उद्घाटन करताना नीता अंबानी म्हणाल्या, हे सेंटर्स म्हणजे नवीन भारताच्या अपेक्षांचे प्रतिबिंब आहे. भारत विकासाच्या कहाणीचा पुढचा अध्याय येथे लिहिला जाईल. मोठी संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रीमियम रिटेलिंग, डायनिंग सुविधा असलेले हे पहिलेच कन्व्हेन्शन सेंटर असून ते मुंबईसाठी लँडमार्क बनेल.

तसेच, जिओ वर्ल्ड सेंटरमधील धीरुभाई अंबानी स्क्वेअर सामान्य लोक आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. सामान्य लोकांना इथे मोफत प्रवेश मिळेल, तर मोफत पास dhirubhaiambanisquare.com येथे उपलब्ध आहे. याद्वारे पर्यटक फाऊंटन, फाऊंटन ऑफ जॉय पाहू शकतील. यात आठ फायर शूटर, ३९२ वॉटर जेट आणि ६०० पेक्षा जास्त एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button