breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जनरल अटलांटिकची रिलायन्स रिटेलमध्ये ३,६७५ कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली – अमेरिकेतील जनरल अटलांटिक या खासगी इक्विटी फर्मने रिलायन्सच्या रिलायन्स रिटेलमध्ये ३,६७५ कोटी गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स रिटेलमधील त्यांची ही हिस्सेदारी ०.८४ टक्के आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सिल्वर लेकने रिलायन्स रिटेलमध्ये ७,५०० कोटींची गुंतवणूक केली होती. रिलायन्स रिटेलमधील त्यांची ही हिस्सेदारी १.७५ टक्के आहे.

गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स रिटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करत आहेत. त्यात आतापर्यंत या कंपनीत झालेली ही तिसरी मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे रिलायन्स रिटेलचे भाग भांडवल ४.२८ लाख कोटी झाले आहे. ‘अमेरिकेच्या जनरल अटलांटिकसोबत आमचे संबंध चांगले आहेत. यामुळे ते आणखी विस्तारले याचा मला आनंद आहे’, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. यामुळे भारतातील कंपनीच्या विस्ताराला आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर ‘मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करणे एक चांगली संधी आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला’, असे जनरल अटलांटिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिल फोर्ड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रिलायन्स रिटेलमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एकंदर १३,०५० कोटींची गुंतवणूक झाली आहे. सिल्वर लेक, केकेआर आणि त्यांच्यानंतर जनरल अटलांटिक यांनी केलेले ही रिलायन्स रिटेलमधील तिसरी मोठी गुंतवणूक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button