TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

बोपोडी येथील ब्रह्मकुमारीज संस्थेच्या “ओम शांती” ऑडिटोरियम व स्टुडिओचे लोकार्पण

आमदार अश्विनी जगताप, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची प्रमुख उपस्थिती

पुणे : बोपोडी येथील ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या शिवशक्ती भवन या नुतन वास्तुतील “ओमशांती” ऑडिटोरियम व स्टुडिओचे उद्धघाटन ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या वरिष्ठ राजयोगीनी उर्मिलादीदीजी तसेच वरिष्ठ राजयोगीनी सुनंदादिदीजी, राजयोगी दशरथ भाईजी, यांच्या हस्ते व उद्योजक कृष्णकुमार गोयल, चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या आमदार अश्विनीताई जगताप, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

उपस्थित साधकांना आध्यात्मिक मार्गदर्शन
या प्रसंगी ब्रह्माकुमारीज् संस्थेचा साधक परिवार बहुसंख्येने उपस्थित होते. उर्मिलादीदीजी, सुनंदादिदीजी, व दशरथ भाईंनी उपस्थित साधकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. आमदार अश्विनीताई जगताप, आमदार सिद्धार्थदादा शिरोळे व उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी उपस्थितांना नुतन भवन उद्धघाटनप्रसंगी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत बी. के. लक्ष्मी दिदी यांनी केले सूत्रसंचलन बी. के. श्रीनिधी भाईंनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button