TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

जेएसपीएमच्या ताथवडे कॅंम्पसमध्ये इनोव्हिजनचे उदघाटन

पिंपरी :

डिजीटल आणि ऑनलाईन पेमेंटमुळे क्राईमचा पॅटर्न बदलला आहे. सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढली . वाढती गुन्हेगारी हि पोलीस खाते आणि समाजाला देखील आव्हान ठरत आहे. यावर अधिक तंत्रज्ञान विकसित केल्यास गुन्हेगारीला आळा बसेल. असे मत अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी व्यक्त केले.

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ताथवडे शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इनोव्हिजनच्या (दि. २३ रोजी) उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डसॉल्ट सिस्टिमचे कार्यकारी संचालक हेमंत गाडगीळ, जेएसपीएमचे संचालक ए के भोसले, राजर्षी शाहू इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. के. जैन , संकुल संचालक प्रा सुधीर एल. भिलारे, रवी सावंत, उप प्राचार्य डॉ अविनाश देवस्थळी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ किशनलाल खंडेलवाल, आयडीबीआय बॅंक पाषाण शाखेचे तुषार बोडस, रोनित पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री गाडगीळ म्हणाले कि, आत्मनिर्भर बनविणे हे औद्योगिक किंवा सरकारचे काम नाही तर आपले सर्वांची जबाबदारी आहे.केवळ चार भिंतींच्या आत शिकता येते असे नाही तर ज्ञान संपादनाला मर्यादा नसतात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी दिशा निश्वित करावी लागते.
प्रा भोसले म्हणाले कि,सामाजिक समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा.

राजर्षी शाहू अभियांत्रिकी कॉलेज, व्यवस्थापन, डिप्लोमा आणि फार्मसीच्या इनोव्हिजन ‘या राष्ट्रीय महोत्सवात विद्यार्थी त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करतात. या तांत्रिक कार्यक्रमात देशभरातील नामांकित महाविद्यालये आणि प्रतिष्ठित संस्थांमधील 10,000 हून अधिक अभियांत्रिकी, व्यवस्थापन, डिप्लोमा आणि फार्मसीचे विद्यार्थी सहभागी झालेले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राजकुंवर डुबल यांनी तर आभार डॉ अविनाश बडधे यांनी मानले.

“वसुधैव कुटुंबकम्” ही इनोव्हिजन-2023 ची थीमवर असलेल्या या इनोव्हिजन मध्ये 20+ तांत्रिक स्पर्धांचा समावेश आहे. जे एस पीएमचे संस्थापक सचिव डॉ. टी. जे. सावंत, आणि संस्था संचालक डॉ. आर. एस. जोशी आणि अनिल भोसले संचालक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button