breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

दिल्ली विधानसभा : आम आदमी पार्टीचे दोन आमदार आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सात उमेदवार रिंगणात, कोण आहेत उमेदवार नक्की वाचा!

नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

भाजपाला ‘कात्रजचा घाट’ दाखवत महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या निवडणुकीत पक्षाकडून सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत, अशी माहिती पक्षाचे केंद्रीय निरीक्षक के. के. शर्मा आणि वृजमोहन श्रीवास्तव यांनी दिली आहे.

          पक्षाचे दिल्ली प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी सर्व उमेदवारांना ताकदीने लढण्याचा सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, आम आदमी पार्टीतून कमांडर सुरेंद्र आणि चौधरी फतेह सिंह यांनी ‘आप’चा राजीनामा दिला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

          केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य के. के. शर्मा, बृजमोहन श्रीवास्तव, कुँवर प्रताप सिंह, राजीव कुमार झा, रमेश गुप्ता, युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, डॉ. सीमा मलिक, सोनीया दूहन यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

          तसेच, राष्ट्रवादीच्या केंद्रीय कार्यालयीन सचिव एस. आर. कोहली यांनी दिल्लीच्या मतदारांना आवाहन केले आहे की, अन्य पक्षांच्या भूलथापांना बळी न पडता राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करावे.

***

राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विधानसभा मतदार संघ…

  • कमांडो सुरेंद्र – दिल्ली कँट
  • चौधरी फतेह सिंह – गोकुलपूर
  • जाहिद अली- बाबरपुर
  • प्रशांत गौर – छतरपुर
  • मयूर भान – मुस्तफाबाद
  • असिम बेग – चाँदनी चौक
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button