breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हाथरस येथील अत्याचारप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा, राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलची मागणी

पिंपरी । प्रतिनिधी

उत्तरप्रदेश येथील हाथरस येथे वाल्मिकी समाजाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीनेउत्तर प्रदेशातील हाथरसमधील तरुणीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याचा मागणीसाठी  तहसीलदार गीता गायकवाड पिंपरी चिंचवड तहसील कार्यालय आकुर्डी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा  निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष विनोद कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय महिला शहराध्यक्षा गंगाताई धेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष_  बाळासाहेब पिल्लेवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष विठ्ठल उर्फ नाना धेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुख्य संघटक बाबुराव खळसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुख्य सरचिटणीस अभिजीतदादा आल्हाट,पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी विधानसभा अध्यक्ष सचिन सकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शहर उपाध्यक्ष सूर्यकांत पात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर सरचिटणीस राजेंद्र शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष योगेश आबा आयवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अनिकेत मोहिते, उद्योजक मोतीलाल पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महिला शहर उपाध्यक्षा- ज्योतीताई डोळस, उद्योजक आकाश मोहिते, , संजय मोरे व पिंपरी चिंचवड शहर  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button