breaking-newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्र

देशभरातील टोमॅटोचे वाढते दर पाहता सरकार नेपाळमधून करणार टोमॅटोची आयात!

Import Of Tomatoes : देशभरात झालेल्या टोमॅटोच्या दरवाढीचा धसका घेत चिंताग्रस्त झालेल्या केंद्र सरकारने अखेर नेपाळमधून टोमॅटो आयातीचा निर्णय घेतलेला आहे. टोमॅटोची ही आयात ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत राहणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने काढलेल्या पत्रात नमूद केले आहे. सध्या बाजारपेठेत टोमॅटोचा घाऊक दर ७०० ते ११०० रुपये असून, किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर १५० ते १६० रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे आयात टोमॅटोची आवक कधी सुरू होऊन ती वाढणार त्यानुसार दरपातळीवर परिणाम होईल.

तर आवक वाढल्यास टोमॅटोचे दर घटून देशांतर्गत टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे नेपाळमधील टोमॅटोची प्रत्यक्ष होणारी आयात किती लवकर आणि किती प्रमाणात होणार, त्यानुसार दर पातळीवर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती कृषी व पणन विभागातील सूत्रांनी दिली. नेपाळमधून भारतात टोमॅटो फळांच्या वापरासाठी आयात करण्याच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिली आहे.

हेही वाचा – शरद पवार यांना मोठा धक्का! प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा राजीनामा

तसेच आयात करताना तेथील कीडरोगमुक्त टोमॅटोच्या आयातीवर लक्ष केंद्रित करण्याबाबत फरीदाबाद येथील वनस्पती संरक्षण सल्लगार यांना दिलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आयात टोमॅटोची आवक वाढल्यानंतरच बाजारातील दरावर परिणाम संभवू शकतो, असेही सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button