breaking-newsTOP Newsमहाराष्ट्र

‘संभाजी बिडी’ कंपनीच्या नाकातून धूर काढणार, शिवधर्म फाऊंडेशनचा इशारा

अहमदनगर – गेल्या 80 वर्षांपासून महाराष्ट्रात संभाजी महाराजांच्या नावाने बिडी विक्री केली जात आहे. हा संभाजी महाराजांचा अपमान आहे. संभाजी बिडीचे नाव आता बदलण्यात यावे. अन्यथा 1 सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा, शिवधर्म फाउंडेशनने दिला आहे.

या ना त्या मुद्यांवरून शिवरायांचा अवमान झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला. यानंतर शिवभक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला. पण आता, संभाजी बिडीबद्दल शिवभक्तांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती संभाजी यांच्या नावाने महाराष्ट्रात गेली 80 वर्षांपासून संभाजी बिडी या नावाने धूम्रपान उत्पादन केले जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची युद्धनीती, लेखन, संपूर्ण जगाला माहिती आहे. असं असताना जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाने बिडी उत्पादन होतं आहे.

या बिडीच्या बंडलवर महाराजांच्या नावाने याची विक्री होते. तो कागद फाडून फेकला जातो. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान होत आहे, हा अवमान सहन केला जाणार नाही. यासाठी या बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीने नाव बदलून निर्मिती करावे, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दिपकअण्णा काटे यांनी केली आहे.

जर या संबंधीत कंपनीने नाव जर बदलले नाही तर 1 सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button