breaking-newsराष्ट्रिय

लुटमार करण्यासाठी त्याने पत्नीचा पोलीस युनिफॉर्म दिला प्रेयसीला

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून लुटमार करणाऱ्या एका महिलेला तिच्या प्रियकरासह अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या इंदूर शहरातून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दरोडयात गुन्ह्यात दोघांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनाकडून सांगण्यात आले.

आरोपी महिला पोलीस असल्याचे भासवून लुटमार करायची. या प्रकरणात सहआरोपी असलेल्या तिच्या प्रियकरानेच पत्नीचा पोलीस युनिफॉर्म लुटमार करण्यासाठी तिला दिला होता. आरोपीची पत्नी मध्य प्रदेश पोलीस दलात निरीक्षक आहे.

पोलिसांनी महिलेकडून बनावट पोलीस ओळखपत्र जप्त केले आहे. आरोपींची ओळख पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाही. गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button