breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

विश्वचषकात ICC तर्फे प्रत्येक संघाला मिळाले इतक्या कोटीचे बक्षिसे; कमाई वाचून तुम्हीही व्हाल चकित

World Cup 2023 : यंदा टीम इंडिया वर्ल्डकप फायनल जिंकून ऑस्ट्रेलियाकडून २००३ मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार, अशी अपेक्षा १३० कोटी भारतीय क्रिडाप्रेमींना होती. मात्र, त्यांची ही अपेक्षा फोल ठरली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने दमदार खेळी करत टीम इंडियाला ६ विकेट्सनी पराभूत केलं. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न यंदाच्या विश्वचषकासाठी भंगलं.

दरम्यान, विश्वचषक विजेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघावर पैशांचा पाऊस पडत आहे. सोबतच या स्पर्धेत सहभागी संघांना बक्षीस म्हणून आयसीसीने किती रक्कम दिली जाणून घेऊयात अगदी थोडक्यात..

हेही वाचा – ‘..म्हणून कपिल देव यांना वर्ल्डकप फायनलचं आमंत्रण दिलं नाही’; संजय राऊतांचा मोदींना टोला 

२०२३ विश्वचषकात कोणत्या संघाला किती पैसे मिळाले?

  • विश्वचषक विजेता : सुमारे ३३ कोटी रुपये (ऑस्ट्रेलिया)
  • विश्वचषक उपविजेता : १६.६५ कोटी (भारत)
  • उपांत्य फेरी : ६.६६ कोटी (दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड)
  • ग्रुप स्टेज मधील प्रत्येक विजेत्या संघाला : ३३.३१ लाख रुपये. (बांगलादेश, श्रीलंका, नेदरलँड)

दरम्यान, एवढेच नव्हे तर आयसीसीने ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक विजयासाठी ३३.३१ लाख रुपयांची बक्षीस रक्कम देण्याचे निश्चित केले होते. टीम इंडियाने या स्पर्धेत चांगली कामगिरी करत सलग १० सामने जिंकले होते. त्यामुळे त्या विजयांचे ४ लाख डॉलर्स, उपांत्य फेरीत प्रवेशाचे ५ लाख डॉलर्स व उपविजेते पदाचे २० लाख डॉलर्स असे एकूण २५ कोटी ६० लाख डॉलर्सचे बक्षीस टीम इंडियाने मिळवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button