breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील गोळीबार मैदानावर नमाज पठण करत रमजान ईद उत्साहात साजरी

पुणे – रमजान ईदनिमित्त शहरातील अनेक भागात मुस्लिम बांधवानी गोळीबार मैदान व ईदगाह मशीद येथे नमाज पठण केले. याप्रसंगी राजकीय पक्ष, विविध संघटनांकडून गुलाबाचे फुल देऊन स्वागत करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

सकाळी साडेनऊ वाजता पहिली नमाज, तर दुसरी नमाज साडेदहा वाजता झाली. नवीन पोशाख परिधान करून लहान मुले, मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने आले होते. एकमेकांची गळेभेट घेत ईदच्या शुभेच्या देत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, काँग्रेस नेते मोहन जोशी, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, आमदार मेधा कुलकर्णी, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका सुजाता शेट्टी व विविध सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी भेट देऊन शुभेच्या दिल्या.

काशेवाडी, भवानी पेठ, हरका नगर, राजेवाडी, लोहियानगर, मोमीन पुरा, गुलटेकडी, डायस प्लॉट, मोदी खाना, सॅलसबरी पार्क , भीमपुरा, चुडा मंताली, कॅम्प आणि कोंढवा परिसरातील सुमारे वीस हजार पेक्षा जास्त  मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी मैदानावर आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button