breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला कसा? वाचा सविस्तर माहिती…

  • ठाकरे सरकारचं चुकलं की शिंदे फडणवीसांकडून निष्काळजीपणा?

  • फॉक्सकॉन प्रकल्पबाबत सर्वांत मोठी माहिती समोर

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

खनिकर्म क्षेत्रातील बडी कंपनी असलेली वेदांत आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणारी तैवानची बडी कंपनी ‘फॉक्सकॉन’ यांनी सेमीकंडक्टर उत्पादित करण्यासाठी प्रकल्प सुरू करायचे ठरवले असून, तो आता गुजरात राज्यात साकारेल. यासाठी झालेल्या करारावर मंगळवारी गुजरात सरकारतर्फे गुजरात सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे सचिव विजय नेहरा यांनी स्वाक्षरी केली. एकूण १.५४ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे.फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्या कारणाने महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा उपेक्षा आली आहे. फॉक्सकॉन प्रकल्पावरुन महाविकास आघाडी आणि शिंदे फडणवीस सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत. अशातच फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता, मग हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? या देशाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर समोर आलंय. गुजरात सरकारने वेदांता फॉक्सकॉनला नेमक्या काय सुविधा दिल्या याची माहितीही समोर आली आहे.

खनिकर्म क्षेत्रातील बडी कंपनी असलेली वेदांत आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणारी तैवानची बडी कंपनी ‘फॉक्सकॉन’ यांनी सेमीकंडक्टर उत्पादित करण्यासाठी प्रकल्प सुरू करायचे ठरवले असून, तो आता गुजरात राज्यात साकारेल. यासाठी झालेल्या करारावर मंगळवारी गुजरात सरकारतर्फे गुजरात सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे सचिव विजय नेहरा यांनी स्वाक्षरी केली. एकूण १.५४ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे. महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पहिल्या पसंतीचे राज्य आहे. या प्रकल्पातून राज्यातील लाखो तरुणांच्या हाताला काम मिळणार होतं. पण हा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्याच्या वाट्याला निराशा आली आहे.

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा?
महाराष्ट्र सोडून फॉक्सकॉनने प्रकल्पसाठी गुजरातची निवड का केली? असा रोकडा प्रश्न कालपासून विरोधी पक्ष शिंदे-फडणवीस सरकारला विचारत आहे. या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. सेमी कंडक्शन धोरण असलेलं गुजरात एकमेव राज्य असल्याने फॉक्सकॉनने प्रकल्पासाठी गुजरातची निवड केल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

गुजरात सरकारने सेमी कंडक्शन धोरण बनविलं, असं धोरण बनवणारं देशातलं एकमेव राज्य. या धोरणांअंतर्गत गुंतवणूक यावी म्हणून स्टेट इलेक्ट्रिक मिशन स्थापन केलं. या मिशन अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना ज्या सुविधा द्यायच्या त्याची मान्यता अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतली. गुजरात सरकार गेल्या फेब्रुवारीपासून गुंतवणुकीसाठी तयार होतं. या पॉलिसीमुळे सेमी कंडक्टर बनविणाऱ्या कंपन्यांनी गुजरात सरकारशी संपर्क साधला. शिंदे सरकार स्थापनेच्या आधी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबर शेवटचची बैठक संपन्न झाली होती. एमओयूवर सह्या करण्याची औपचारिक प्रक्रिया काल पार पडली.

वेदांत फॉक्सकॉनला महाराष्ट्राने काय दिलं होतं?
महाविकास आघाडी सरकारकडून वेदांत – फॉक्सकॉनला ३९ हजार कोटींची सवलत देण्यात आली होती. २० वर्षांसाठी रोज ८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा, स्टँप ड्युटीमध्ये ५ टक्के सूट देण्यात आली होती. वीज दरात १० वर्षांसाठी साडेसात टक्के सूट, तळेगावमधील ४०० एकर जागा मोफत दिली होती. तसंच ७०० एकर जागा ७५ टक्के दराने दिली होती. १२०० मेगावॅटचा अखंडित पुरवठा २० वर्षांसाठी ३ रुपये प्रति युनिट दराने देण्यात आला होता. पाणीपट्टीत ३३७ कोटी रुपयांची सूट, घनकचरा प्रक्रियेवर ८१२ कोटींची सूट देण्यात आली होती.

‘वेदांत’चे अध्यक्ष अनिल अगरवाल म्हणाले…
अहमदाबाद जिल्ह्यात एक हजार एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी ‘वेदांत’ची गुंतवणूक ६० टक्के असेल, तर ‘फॉक्सकॉन’ची गुंतवणूक ४० टक्के असणार आहे. या प्रकल्पातून पुढील दोन वर्षांत सेमीकंडक्टरचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल, असे ‘वेदांत’चे अध्यक्ष अनिल अगरवाल यांनी सांगितले. गुजरात सरकारसमवेत करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ते बोलत होते. गेल्या वर्षी सेमीकंडक्टरची मोठी टंचाई देशात निर्माण झाली होती. याचा फार मोठा फटका वाहन उद्योगाला बसला होता. सेमीकंडक्टर चीन आणि तैवान येथून आयात केले जातात. या दोन्ही देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात सेमीकंडक्टरचे उत्पादन होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक सवलत योजना आणली होती. यामध्ये उत्पादनसंलग्न सवलत योजनाही (पीएलआय) लागू करण्यात आली होती. याचा फायदा घेऊन सेमीकंडक्टर उत्पादन करण्यासाठी वेदान्त-फॉक्सकॉन यांनी संयुक्त अर्ज केला आहे.

फॉक्सकॉन कंपनीची A टू Z माहिती

पुण्यातील तळेगाव येथे नियोजित असलेला वेदांत आणि फॉक्सकॉन या कंपनीचा प्रकल्प गुजरात राज्यात गेल्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. गुजरात सरकारने वेदांत आणि फॉक्सकॉन या कंपनीशी करार केला असून त्याद्वारे गुजरात राज्यात १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. या गुंतवणुकीद्वारे गुजरात राज्यात सेमीकंडक्टर प्रकल्प उभा राहणार असून यातून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून वेदांत कंपनीसोबत असलेल्या फॉक्सकॉन या कंपनीचे नाव चर्चत आले आहे. या फॉक्सकॉन कंपनीबाबत माहिती मिळवण्यासाठी लोकांमध्ये उस्तुकता असून ही कंपनी कोणत्या क्षेत्रात काम करते यावर टाकलेला हा प्रकाशझोत. (a to z information about foxconn, which has signed a deal to set up a semiconductor project in gujarat)

फॉक्सकॉन या कंपनीचे नाव सेमीकंडक्टर निर्मितीच्या जागात अग्रक्रमाने घेतले जाते. फॉक्सकॉनने वेंदात कंपनीसह भारतात काही प्रकल्पांसाठी करार केलेले आहेत. या दोन कंपन्या एकत्रितपणे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करत आहे. हे सामान्यतः एकात्मिक सर्किट्स किंवा मायक्रोचिप म्हणून ओळखले जातात. या मायक्रोचिप सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आढळतात. यात सेल फोन, कार आणि लॅपटॉपसह सर्वच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश आहे. या मायक्रोचिप्स आता आधुनिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

स्मार्टफोनची निर्मिती करणारी जगातील अव्वल कंपनी
फॉक्सकॉन ही कंपनी तैवानमधील एक अग्रगण्य कंपनी आहे. जगप्रसिद्ध ब्रँड अ‍ॅपल, सॅमसंग, सोनी आणि एचपीसह अनेक मोठ्या कंपन्यांसाठी स्मार्टफोनची निर्मिती करणारी फॉक्सकॉन ही अव्वल कंपनी आहे. फॉक्सकॉन या कंपनीत १० लाखांहून अधिक कर्मचारी रात्रंदिवस काम करतात. हे कर्मचारी २४ तासांपेक्षा कमी वेळेत हजारो स्मार्टफोन तयार करतात. यावरून या कंपनच्या विशालतेचा अंदाज सहज लावला जावू शकतो. उत्कृष्ट स्मार्टफोन उत्पादनामुळे फॉक्सकॉन ही कंपनी जगभर प्रसिद्ध आहे.

फॉक्सकॉन या कंपनीचे मुख्यालय तचुंग, न्यू तैपेई, तैवान येथे आहे. फॉक्सकॉन ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्माता म्हणून ओळखली जाते. या कंपनीचे खरे नाव Hon Hai Precision Industry Co. Ltd. असे आहे. परंतु, जगभरात कंपनीची फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप म्हणून ओळखला जातो. ही कंपनी स्मार्टफोन, कॉम्प्युटर चिप्स इत्यादींची निर्मिती करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. फॉक्सकॉन कंपनी अनेक प्रमुख स्मार्टफोन आणि संगणक ब्रँडचे भाग आणि उत्पादने तयार करते. फॉक्सकॉन ही तैवानची सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे.

टेरी गौ आहेत फॉक्सकॉनचे संस्थापक
फॉक्सकॉनचे संस्थापक टेरी गौ हे आहेत. त्यांनी कंपनी २० फेब्रुवारी १९७ रोजी तैवानमध्ये Hon Hai Precision Industry Co., Ltd अशा नावाने सुरू केली. सध्या या कंपनीची फॉक्सकॉन अशीच ओळख आहे. फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवा देणारी कंपनी आहे. विशेष म्हणजे ही कंपनी जगातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये आपली उत्पादने तयार करते आणि त्यांची विक्रीही करते. ही कंपनी जगातील अनेक आघाडीच्या कंपन्यांसाठी स्मार्टफोन आणि संगणकाचे भाग आणि उपकरणे तयार करण्याचे काम करते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button