breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुंबईतील धोकादायक इमारतींच्या दुर्घटनेत गेल्या ५० वर्षांत ८०० जणांचा मृत्यू

मुंबईः मुंबईतील जुन्या, धोकादायक चाळी, इमारतींतील रहिवाशांसमोरील चिंतेचे ढग गडद होतात. मुंबईची इतिहास, भौगोलिकदृष्ट्या वाढ होत असताना शहर भागातील जुन्या चाळी, इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या पन्नास वर्षांत इमारत कोसळून ८०० जणांनी जीव गमावला आहे. कुर्ला पूर्वेतील शिवसृष्टी मार्गावरील धोकादायक म्हणून जाहीर झालेल्या तीन मजली नाईकनगर गृहनिर्माण संस्था इमारतीचा एक भाग सोमवारी रात्री ११.४५ च्या सुमारास खचला. यात १४ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळं पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न उभा ठाकला आहे.

माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार १९७० ते २०१८मध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत तब्बल ८१५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नगररचनाकार आणि वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी धोरणे आखली पाहिजेत. शहरातील मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त (सेस) इमारती आणि उपनगरातील भाडेकरू इमारती कोसळण्यामागील कारणे पूर्णपणे भिन्न आहेत, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

गेल्या काही वर्षात ब्रिटिशकालीन पगडी पद्धतीमुळं हजारो कुटुंबांना घरे गमवावी लागली. कारण, मालकांनी त्यांच्या जुन्या भाडेकरुंना पुर्नविकासाचा फायदा होऊ दिला नाही. कुर्लातील नाईक नगरमधील कोसळलेल्या इमारतीतही भाडेकरु वास्तव्यास होत्या. या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला.ही इमारत वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने आदिवासी वंजारा समाजासाठी दिली होती. तथापि, वंजारा समाजाच्या सदस्यांकडे अधिकार नसतानाही, त्यांनी त्यांची घरे इतर समाजातील लोकांना विकली. मात्र, त्यांना ही घरं विकण्याचा अधिकार नाही हे कळल्यानंतर त्यांनी घरे भाड्याने दिली. त्यामुळं इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष होत होते.

मुंबईतील वांद्रे-सायन ते कुलाबा पट्ट्यातील शहर भागात उपकरप्राप्त इमारतींची संख्या १४ हजारांपेक्षाही जास्त आहे. मुख्य म्हणजे त्यातील कित्येक बांधकामांना १०० वर्षांचा इतिहास आहे. हा इतिहास मांडला जातानाच तिथल्या बांधकामांचा दर्जा हा चिंतेचा विषय आहे. त्यावर अद्याप तोडगा निघत नसल्याने येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. केवळ डागडुजी, दुरुस्ती असे उपाय केले जात आहेत. या सर्व उपकरप्राप्त इमारतींची जबाबदारी म्हाडा प्राधिकरणाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडे सोपविण्यात आली.

  • म्हणून घर सोडण्यास नकार

धोकादायक, अतिधोकादायक इमारती दक्षिण मुंबई, मध्य मुंबई आदी भागात वसल्या आहेत. त्या इमारतींतून स्वखर्चाने अन्यत्र कुठे राहण्यास जाणे किंवा म्हाडाच्या संक्रमण शिबिराचा पर्याय अवलंबणे, असे दोन पर्याय असतात. परंतु, आर्थिक क्षमतेअभावी बहुतांश रहिवाशांना स्वखर्चाने इतरत्र राहणे परवडणारे नाही. तसेच, संक्रमण शिबिराचा पर्यायही स्वीकारण्यास ते तयार नाहीत. संक्रमण शिबिरे प्रामुख्याने उपनगरांमध्ये आहे. त्यांचाही दर्जा तितकासा चांगला नसल्याच्या तक्रारी नेहमीच केल्या जातात. त्याशिवाय, एकदा का संक्रमण शिबिरात राहण्यास गेलो की, पुन्हा मूळ घरात कधी परतणार, याची कोणतीही शाश्वती दिली जात नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button