महाराष्ट्र

सागांवात “घर तिथे किल्ला” स्पर्धेतून मुलांनी गिरविले ऐतिहासिक धडे

सागांव, (महा-ई-न्यूज) – किल्ले बनविण्याची परंपरा अखंड टिकविण्यासाठी गुंडराज (भैय्या) लोहार युवा मंचने सागांवात “घर तिथे किल्ला” ही स्पर्धा घेण्याचा विक्रम केला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना मानाची बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. युवा मंचच्या पहिल्याच प्रयत्नाला चांगले यश मिळाले असून सागांवात या स्पर्धेचे कौतुक होत आहे.

दिवाळी म्हटले की लहान मुलांची किल्ले बनविण्याची धडपड सुरू असते. त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गुंडराज (भैय्या) लोहार युवा मंचने पुढाकार घेऊन ही भव्यदिव्य स्पर्धा गावात घेतली. स्पर्धेत लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. त्यामध्ये पंधरा स्पर्धकांची उत्कृष्ट कलाकुसर प्रदर्शित केली.

स्पर्धेतील प्रथम क्रमांक श्री गजानन महाराज ग्रुपने पटकावला. द्वितीय क्रमांक वारणा ग्रुपने आजमावला. तर, तृतीय क्रमांक सिध्देश गायकवाड याने मिळविला. विघ्नहर्ता मंडळाने स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. विराज पवार याला पाचव्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. कार्यक्रमात युवा मंचचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष अदिनाथ पाटील, सचिन संतोष कोरे, स्वप्निल लोहार, विजय संकपाळ, सुनिल लोले, संभाजी आसवले, वैभव कुंभार आदी उपस्थित होते.

स्पर्धेत परिक्षक म्हणून अनिल पाटील, अमोल पाटील, शीतल नांगरे, अमर जाधव यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या संयोजनात संजय संकपाळ, अक्षय गायकवाड, नितीन पाटील, विद्या पाटील, सतिश सुतार, अभिजीत शिंदे, अनिल माने यांनी पुढाकार घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button