breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

पंजाबमध्ये सर्व जागांसाठी, तर उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. पाच राज्यांपैकी आज पंजाबमधील सर्व ११७ जागांसाठी मतदान होत असून उत्तर प्रदेशातील ५९ जागांसाठी आज, रविवारी मतदान सुरू झालंय. उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून तेथे मतदानाचे सात टप्पे आहेत. तर पंजाबमध्ये आज एकाच दिवशी पूर्ण मतदान होईल. पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये लोक मत देण्यासाठी मतदान केंद्रांवर दिसून येत आहे.९ वाजेपर्यंत पंजाबमध्ये ४.८० टक्के मतदारांनी तर उत्तर प्रदेशमध्ये ८.१५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

 

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी खरड येथील शिव मंदिरात पुजा केली. यावेळी पंजाबमध्ये चांगले आणि पारदर्शी सरकार यावे, यासाठी प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितलं.तर आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले भगवंत मान यांनी मतदानाचा हक्क बजावला असून पंजाबच्या लोकांनी त्यांच्या आवडत्या उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.तर उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये नववधूने सासरी जाण्यापूर्वी पतीसोबत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय सुनिल जाखड, मनिष तिवारी, पंजाबचे शिक्षणमंत्री परगत सिंग यांच्यासह अनेक राज्य आणि केंद्रातील मंत्र्यांनी पंजाब आणि उत्तर प्रदेशात आज मतदानाचा हक्क बजावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button