breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट १९.२२

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा वाढला असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील बेड व्यवस्थापन, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्यास प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. सध्यस्थितीत कोरोना रुग्णाचा पॉझिटिव्हीटी दर १९.२२ तर मृत्यूदर १.५१ टक्के आहे. त्यामुळे शहरात खासगी आणि शासकीय अशी ७ हजार ६१३ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती शिरीष पोरेड्डी यांनी दिली.

पोरेड्डी म्हणाले की, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी वैदयकीय विभाग सक्षमतेने काम करीत आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९४ टक्के, तर पॉझिटिव्हीटी दर १९.२२ टक्के दर आहे. तर मृत्यूचा दर १.५२ टक्के आहे. तसेच होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी गाईडलाईन करण्यासाठी दोन पाळयांमध्ये डॉक्टरांचे पथक काम करीत आहे. तसेच ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’

तसेच महापालिका रूग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात तीन हजार इंजेक्शन महापालिकेला उपलब्ध होणार आहे, त्यामुळे त्यातील काही इंजेक्शन खासगी रुग्णालयातील रूग्णांना देता येतील का? याबाबत आयुक्त राजेश पाटील विचार करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button