breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

बँक खातेदारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी…आता केवायसी डिजिटल पद्धतीने…

बँक खातेदारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. आता केवायसीसाठी खातेदारांना प्रत्यक्ष बँकेत जाण्याची गरज नाही. डिजिटल पद्धतीने केवायसी बँक खात्यात अपडेट होणार आहे. रिझर्व बँकेंची डिजिटल केवायसीला मंजुरी मिळाली आहे. त्याद्वारे केंद्र सरकारने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक नियमातही बदल केलेत….

केवायसीकरता बँकेत स्वतः येऊन कागदपत्रे जमा करणे हे थांबवण्यासाठी सेंट्रल बँकेने ग्राहकांना लाईव्ह फोटो वापरण्याची संधी दिली आहे. त्यासोबतच अधिकृत कागदपत्रे देखील जोडणे अनिवार्य आहेत. तसेच व्हिडिओ कॉलद्वारे कागदपत्रे दाखवल्यानंतर ग ग्राहकाला संबंधीत कागादपत्रे geo-tagging च्या वेबसाईटवर जाऊन स्कॅन करून डाऊनलोड करायचे आहे…त्यामुळे आपण ज्या ठिकाणी राहतोय किंवा जिथून आपण व्हडिओ कॉल केलेला आहे त्या ठिकाणचा tag coad बँकेला आपोआप मिळेलं…ग्राहकाने त्याच देशातून हे करत असल्याचे स्पष्ट होण्याकरता भौगोलिक टॅगिंग करणं महत्वाचं असणार आहे.

आरबीआयकडून फक्त केवायसीकरताच ऑनलाईन सेवा पुरवली असं नाही. आरबीआयकडून आता डिजिटल सही केलेली कागदपत्रे, ग्राहकाच्या डिजिटल लॉकर खात्यात दिलेली कागदपत्रे जे अकाऊंट ओपनिंग करतात लागू शकतात. तसेच ग्राहकांना त्यांची वैयक्तिक कागदपत्रे ऑनलाइन दाखलं करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याला ‘डिजी-लॉकर’ असे म्हणतात…
‘नवीन वर्षाची सुरूवात खूप चांगली झाली,’ असं वर्कऍपचे संस्थापक रूद्रजीत देसाई यांनी म्हटलंय. पुढे देसाई म्हणतात की,’या सोईमुळे नागरिकांना मदत होईलच पण त्यासोबत देशाची आर्थिक व्यवस्था वाढवण्यासाठी देखील मदत होणार आहे. ‘देसाई यांनी बँकेला व्हिडिओ केवायसी हा पर्याय दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button